🚩मराठी (Marathi)EVENTS

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच घडवा मुलांचे उज्ज्वल भविष्य — श्री. ॲड. विपुल पाटील

बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी पालकांसाठी ‘चला मुलांमध्ये रुजवूया दृष्टिकोन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानास प्रमुख व्याख्याते श्री. ॲड. विपुल पाटील (उद्योजक लेखक व कवी), श्री. रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी या वेब सिरीजचे प्रसिद्ध कलाकार), शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

🎓

Sunita Rasal

ADMIN

Published 30 September 2026•👁️ 42 views
Share this story:
📰Newspaper Clipping Export — VP Supe News Digest

Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.

VP SUPE
News Digest
Vidya Pratishthan's Supe English Medium School
Supe, Tal. Baramati, Dist. Pune — 412204 | Digital News Portal
Official School Publication • Digital Edition • www.vpsupenews.in
Reg: VPSUPE/2026/MAH • Digital EditionWeb Portal: www.vpsupenews.inWednesday, 30 September 2026

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच घडवा मुलांचे उज्ज्वल भविष्य — श्री. ॲड. विपुल पाटील

बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी पालकांसाठी ‘चला मुलांमध्ये रुजवूया दृष्टिकोन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानास प्रमुख व्याख्याते श्री. ॲड. विपुल पाटील (उद्योजक लेखक व कवी), श्री. रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी या वेब सिरीजचे प्रसिद्ध कलाकार), शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच घडवा मुलांचे उज्ज्वल भविष्य — श्री. ॲड. विपुल पाटील

प्रतिनिधी Sunita Rasal :
सुपे : *वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच घडवा मुलांचे उज्ज्वल भविष्य’ — श्री. ॲड. विपुल पाटील* सुपे : विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी पालकांसाठी ‘चला मुलांमध्ये रुजवूया दृष्टिकोन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानास प्रमुख व्याख्याते श्री. ॲड. विपुल पाटील (उद्योजक लेखक व कवी), श्री. रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी या वेब सिरीजचे प्रसिद्ध कलाकार), शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. श्री. विपुल पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, मुले औपचारिक शिक्षण शाळेत, तर अनौपचारिक शिक्षण कुटुंबातून घेत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देत त्यांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करावे. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची चुकीची किंवा खोटी उत्तरे देण्यापेक्षा ‘मला माहित नाही’ असे प्रामाणिकपणे सांगून त्याचे उत्तर शोधण्याची सवय पालकांनी मुलांमध्ये रुजवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयुष्यातील अगदी लहानसा निर्णय, साधा प्रसंग किंवा क्षुल्लक कृतीदेखील भविष्यात मोठा बदल घडवून आणू शकते, असे सांगताना त्यांनी ‘बटरफ्लाय इफेक्ट’चे उदाहरण दिले. एका छोट्या ठिणगीमुळे किंवा घटनेमुळे पुढे मोठे परिणाम घडू शकतात, त्यामुळे प्रत्येक कृतीचा परिणाम विचारात घेण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

आपल्या प्रत्यक्ष अनुभवांमधून विविध उदाहरणे देत त्यांनी पालकांना मुलांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन केले. मुलांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेणे, त्यांना विचार करण्याची संधी देणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही पालक व शिक्षकांची सामूहिक जबाबदारी आहे असे पालकांशी संवाद साधताना सांगितले.

व्याख्यानाबद्दल पालकांनी मत व्यक्त करताना आम्हाला आदर्श पालकत्व कसे असावे या प्रश्नाचे उत्तर मिळाले व मुलांना वेळ देणे व त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे हे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. सुनिता रसाळ यांनी केले.

🌐www.vpsupenews.in
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६ | आवृत्ती: सुपे
VP Supe — News Digest
वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच घडवा मुलांचे उज्ज्वल भविष्य — श्री. ॲड. विपुल पाटील
*वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच घडवा मुलांचे उज्ज्वल भविष्य’ — श्री. ॲड. विपुल पाटील* सुपे : विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी पालकांसाठी ‘चला मुलांमध्ये रुजवूया दृष्टिकोन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानास प्रमुख व्याख्याते श्री. ॲड. विपुल पाटील (उद्योजक लेखक व कवी), श्री. रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी या वेब सिरीजचे प्रसिद्ध कलाकार), शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. श्री. विपुल पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, मुले औपचारिक शिक्षण शाळेत, तर अनौपचारिक शिक्षण कुटुंबातून घेत असतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देत त्यांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करावे. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची चुकीची किंवा खोटी उत्तरे देण्यापेक्षा ‘मला माहित नाही’ असे प्रामाणिकपणे सांगून त्याचे उत्तर शोधण्याची सवय पालकांनी मुलांमध्ये रुजवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्यातील अगदी लहानसा निर्णय, साधा प्रसंग किंवा क्षुल्लक कृतीदेखील भविष्यात मोठा बदल घडवून आणू शकते, असे सांगताना त्यांनी ‘बटरफ्लाय इफेक्ट’चे उदाहरण दिले. एका छोट्या ठिणगीमुळे किंवा घटनेमुळे पुढे मोठे परिणाम घडू शकतात, त्यामुळे प्रत्येक कृतीचा परिणाम विचारात घेण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. आपल्या प्रत्यक्ष अनुभवांमधून विविध उदाहरणे देत त्यांनी पालकांना मुलांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन केले. मुलांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेणे, त्यांना विचार करण्याची संधी देणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही पालक व शिक्षकांची सामूहिक जबाबदारी आहे असे पालकांशी संवाद साधताना सांगितले. व्याख्यानाबद्दल पालकांनी मत व्यक्त करताना आम्हाला आदर्श पालकत्व कसे असावे या प्रश्नाचे उत्तर मिळाले व मुलांना वेळ देणे व त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. सुनिता रसाळ यांनी केले.

💬Get Instant News on WhatsApp

Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.

Join WhatsApp Group →
Share this story:

Related School Stories

EVENTS

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा!

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

SPORTS

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

SPORTS

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.