🚩मराठी (Marathi)EVENTS

उत्तम विचारांची दिशा, उज्ज्वल भविष्याची वाट असते. - मा. सोनाली खाडे

अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांशी विशेष संवाद- नुकत्याच अपघात झालेल्या एसटी महामंडळाच्या बसमधील विद्यार्थ्यांशी मार्गदर्शिका मा. सोनाली खाडे यांनी विशेष संवाद साधला.

🎓

Sunita Rasal

ADMIN

Published 22 September 2026•👁️ 1149 views
Share this story:
📰Newspaper Clipping Export — VP Supe News Digest

Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.

VP SUPE
News Digest
Vidya Pratishthan's Supe English Medium School
Supe, Tal. Baramati, Dist. Pune — 412204 | Digital News Portal
Official School Publication • Digital Edition • www.vpsupenews.in
Reg: VPSUPE/2026/MAH • Digital EditionWeb Portal: www.vpsupenews.inTuesday, 22 September 2026

उत्तम विचारांची दिशा, उज्ज्वल भविष्याची वाट असते. - मा. सोनाली खाडे

अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांशी विशेष संवाद- नुकत्याच अपघात झालेल्या एसटी महामंडळाच्या बसमधील विद्यार्थ्यांशी मार्गदर्शिका मा. सोनाली खाडे यांनी विशेष संवाद साधला.

उत्तम विचारांची दिशा, उज्ज्वल भविष्याची वाट असते.  - मा. सोनाली खाडे

प्रतिनिधी Sunita Rasal :
सुपे : *उत्तम विचारांची दिशा, उज्ज्वल भविष्याची वाट असते. - मा. सोनाली खाडे* सुपे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : विद्या प्रतिष्ठानचे सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “उत्तम मन, उज्ज्वल भविष्य” या विषयावर विशेष विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रास मा. सोनाली खाडे, (मानसशास्त्रज्ञ, हिप्नोथेरपिस्ट व माइंड कोच) बारामती, शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, इयत्ता ६ वी ते १२ वीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य, ताण-तणाव व चिंता व्यवस्थापन तसेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर मा. सोनाली खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत व सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व स्पष्ट केले. “स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतःच असता,” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांवर, कृतींवर आणि निर्णयांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले.

तसेच इतर लोक आपल्या कृतीबद्दल काय विचार करतील, यापेक्षा आपल्या कृतीचा स्वतःच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाताना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य संगत यांची भूमिका त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जीवनशैली घडविण्यासाठी त्यांच्या पालकांची ही महत्त्वाची भूमिका असते याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

*अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांशी विशेष संवाद*- नुकत्याच अपघात झालेल्या एसटी महामंडळाच्या बसमधील विद्यार्थ्यांशी मार्गदर्शिका मा. सोनाली खाडे यांनी विशेष संवाद साधला.

अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती, चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी त्यांनी मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनपर सत्रामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावनांची जाणीव, ताण-तणावाचे व्यवस्थापन आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा व जीवनातील आई-वडिलांचे महत्व समजले. असे मत समृद्धी कदम, अनुष्का खराडे आणि अनुष्का केदारी या विद्यार्थिनींनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चांदगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दादा राऊत यांनी केले.

🌐www.vpsupenews.in
मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६ | आवृत्ती: सुपे
VP Supe — News Digest
उत्तम विचारांची दिशा, उज्ज्वल भविष्याची वाट असते.  - मा. सोनाली खाडे
*उत्तम विचारांची दिशा, उज्ज्वल भविष्याची वाट असते. - मा. सोनाली खाडे* सुपे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : विद्या प्रतिष्ठानचे सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “उत्तम मन, उज्ज्वल भविष्य” या विषयावर विशेष विद्यार्थी केंद्रित मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रास मा. सोनाली खाडे, (मानसशास्त्रज्ञ, हिप्नोथेरपिस्ट व माइंड कोच) बारामती, शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, इयत्ता ६ वी ते १२ वीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य, ताण-तणाव व चिंता व्यवस्थापन तसेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर मा. सोनाली खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत व सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व स्पष्ट केले. “स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतःच असता,” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांवर, कृतींवर आणि निर्णयांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच इतर लोक आपल्या कृतीबद्दल काय विचार करतील, यापेक्षा आपल्या कृतीचा स्वतःच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाताना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य संगत यांची भूमिका त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जीवनशैली घडविण्यासाठी त्यांच्या पालकांची ही महत्त्वाची भूमिका असते याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. *अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांशी विशेष संवाद*- नुकत्याच अपघात झालेल्या एसटी महामंडळाच्या बसमधील विद्यार्थ्यांशी मार्गदर्शिका मा. सोनाली खाडे यांनी विशेष संवाद साधला. अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती, चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी त्यांनी मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनपर सत्रामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावनांची जाणीव, ताण-तणावाचे व्यवस्थापन आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा व जीवनातील आई-वडिलांचे महत्व समजले. असे मत समृद्धी कदम, अनुष्का खराडे आणि अनुष्का केदारी या विद्यार्थिनींनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चांदगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दादा राऊत यांनी केले.

💬Get Instant News on WhatsApp

Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.

Join WhatsApp Group →
Share this story:

Related School Stories

EVENTS

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा!

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

SPORTS

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

SPORTS

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.