🚩मराठी (Marathi)EVENTS

Market Fair २०२६’ मधून विद्यार्थ्यांना मिळाले उद्योजकता व आर्थिक साक्षरतेचे धडे.

Market Fair 2026 मधून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे. सुपे, दि. 12 सप्टेंबर: विद्या प्रतिष्ठान सुपे EMS मध्ये 'Market Fair 2026' उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी 350 स्टॉलद्वारे गणपती मूर्ती, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करत सुमारे 3.5 लाखांची उलाढाल केली व प्रत्यक्ष व्यवसायाचे धडे घेतले.

🎓

Editor Pradnyaruchi Kamble

EDITOR

Published 14 September 2026•👁️ 446 views
Share this story:
📰Newspaper Clipping Export — VP Supe News Digest

Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.

VP SUPE
News Digest
Vidya Pratishthan's Supe English Medium School
Supe, Tal. Baramati, Dist. Pune — 412204 | Digital News Portal
Official School Publication • Digital Edition • www.vpsupenews.in
Reg: VPSUPE/2026/MAH • Digital EditionWeb Portal: www.vpsupenews.inMonday, 14 September 2026

Market Fair २०२६’ मधून विद्यार्थ्यांना मिळाले उद्योजकता व आर्थिक साक्षरतेचे धडे.

Market Fair 2026 मधून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे. सुपे, दि. 12 सप्टेंबर: विद्या प्रतिष्ठान सुपे EMS मध्ये 'Market Fair 2026' उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी 350 स्टॉलद्वारे गणपती मूर्ती, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करत सुमारे 3.5 लाखांची उलाढाल केली व प्रत्यक्ष व्यवसायाचे धडे घेतले.

Market Fair २०२६’ मधून विद्यार्थ्यांना मिळाले उद्योजकता व आर्थिक साक्षरतेचे धडे.

प्रतिनिधी Editor Pradnyaruchi Kamble :
सुपे : Market Fair २०२६’ मधून विद्यार्थ्यांना मिळाले उद्योजकता व आर्थिक साक्षरतेचे धडे. सुपे, दि. १२ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, व्यवसाय व उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासोबतच खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रत्यक्ष अनुभवातून समजावेत, या उद्देशाने विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत ‘Market Fair 2026’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माता पालकांमधून माधुरी राहुल खराडे, वैशाली किशोर साबळे, ज्योती राहुल ढमढेरे, सुप्रिया अमोल भापकर आणि शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. राजेंद्र जगदाळे अध्यक्ष रोटरी क्लब कुरकुंभ MIDC, अनिल शितोळे सचिव रोटरी क्लब कुरकुंभ MIDC यांची विशेष उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून विक्रीचे व्यवस्थापन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्वतः बनविलेल्या गणपती मूर्तीचे स्टॉल, गणपती सजावट साहित्य स्टॉल, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळे, स्टेशनरी, विविध मसाले, तसेच Fun Games आणि विविध डेकोरेशन साहित्याचे स्टॉल आकर्षणाचे केंद्र ठरले.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूंची निवड, किंमत ठरविणे, खरेदी-विक्री, ग्राहकांशी संवाद, पैशांचे व्यवहार, नफा-तोटा आणि व्यवसायाचे प्राथमिक नियोजन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक नियोजन, आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि उद्योजकतेची भावना विकसित होण्यास मदत झाली. Market Fair चे उत्तम आयोजन केल्याबद्दल श्री. अमोल भापकर या पालकांनी स्वयंस्फूर्तीने शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांचेकडे धन्यवाद व्यक्त करत फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‘Market Fair 2026’ हा उपक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. सर्व स्टॉल वरील सर्व वस्तू व साहित्य ग्राहकांनी खरेदी केल्यामुळे मुलांचा उत्साह द्विगुणीत झाला . विद्यार्थ्यांनी एकूण 350 विक्री स्टॉल उभारले होते याची एकूण आर्थिक उलाढाल अंदाजे किमान 3 लाख 50 हजार रुपये झाल्याचा अंदाज शिक्षकांनी व्यक्त केला .

विद्यार्थ्यांनी स्वतःचे मत व्यक्त करताना पैसे कमविताना आई-वडिलांना किती कष्ट घ्यावे लागतात याची आज आम्हाला जाणीव झाली असून यापुढील काळात आम्ही पैशाचा गैरवापर करणार नाही असे देखील सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. राऊत दादा आणि विद्यार्थ्यांमधून आपल्या शाळेचे इयत्ता ९वी चे विद्यार्थी शिकीलगर अरकान वसिम व गवळी तन्मय तुषार यांनी केले.

🌐www.vpsupenews.in
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६ | आवृत्ती: सुपे
VP Supe — News Digest
Market Fair २०२६’ मधून विद्यार्थ्यांना मिळाले उद्योजकता व आर्थिक साक्षरतेचे धडे.
Market Fair २०२६’ मधून विद्यार्थ्यांना मिळाले उद्योजकता व आर्थिक साक्षरतेचे धडे. सुपे, दि. १२ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, व्यवसाय व उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासोबतच खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रत्यक्ष अनुभवातून समजावेत, या उद्देशाने विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत ‘Market Fair 2026’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माता पालकांमधून माधुरी राहुल खराडे, वैशाली किशोर साबळे, ज्योती राहुल ढमढेरे, सुप्रिया अमोल भापकर आणि शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. राजेंद्र जगदाळे अध्यक्ष रोटरी क्लब कुरकुंभ MIDC, अनिल शितोळे सचिव रोटरी क्लब कुरकुंभ MIDC यांची विशेष उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून विक्रीचे व्यवस्थापन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्वतः बनविलेल्या गणपती मूर्तीचे स्टॉल, गणपती सजावट साहित्य स्टॉल, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळे, स्टेशनरी, विविध मसाले, तसेच Fun Games आणि विविध डेकोरेशन साहित्याचे स्टॉल आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूंची निवड, किंमत ठरविणे, खरेदी-विक्री, ग्राहकांशी संवाद, पैशांचे व्यवहार, नफा-तोटा आणि व्यवसायाचे प्राथमिक नियोजन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक नियोजन, आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि उद्योजकतेची भावना विकसित होण्यास मदत झाली. Market Fair चे उत्तम आयोजन केल्याबद्दल श्री. अमोल भापकर या पालकांनी स्वयंस्फूर्तीने शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांचेकडे धन्यवाद व्यक्त करत फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‘Market Fair 2026’ हा उपक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. सर्व स्टॉल वरील सर्व वस्तू व साहित्य ग्राहकांनी खरेदी केल्यामुळे मुलांचा उत्साह द्विगुणीत झाला . विद्यार्थ्यांनी एकूण 350 विक्री स्टॉल उभारले होते याची एकूण आर्थिक उलाढाल अंदाजे किमान 3 लाख 50 हजार रुपये झाल्याचा अंदाज शिक्षकांनी व्यक्त केला . विद्यार्थ्यांनी स्वतःचे मत व्यक्त करताना पैसे कमविताना आई-वडिलांना किती कष्ट घ्यावे लागतात याची आज आम्हाला जाणीव झाली असून यापुढील काळात आम्ही पैशाचा गैरवापर करणार नाही असे देखील सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. राऊत दादा आणि विद्यार्थ्यांमधून आपल्या शाळेचे इयत्ता ९वी चे विद्यार्थी शिकीलगर अरकान वसिम व गवळी तन्मय तुषार यांनी केले.

💬Get Instant News on WhatsApp

Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.

Join WhatsApp Group →
Share this story:

Related School Stories

EVENTS

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा!

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

SPORTS

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

SPORTS

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.