🚩मराठी (Marathi)EVENTS

कौशल्यातून साकारले इको-फ्रेंडली बाप्पा, मार्केट फेअरमधून विद्यार्थी घेणार उद्योजकतेचे धडेl

विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित कार्यशाळेतून साकारलेले गणपती व डेकोरेशन साहित्य शनिवारी होणाऱ्या मार्केट फेअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ! विद्यार्थी घेणार व्यवसायाचे धडेl

🎓

Editor Pradnyaruchi Kamble

EDITOR

Published 11 September 2026•👁️ 696 views
Share this story:
📰Newspaper Clipping Export — VP Supe News Digest

Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.

VP SUPE
News Digest
Vidya Pratishthan's Supe English Medium School
Supe, Tal. Baramati, Dist. Pune — 412204 | Digital News Portal
Official School Publication • Digital Edition • www.vpsupenews.in
Reg: VPSUPE/2026/MAH • Digital EditionWeb Portal: www.vpsupenews.inFriday, 11 September 2026

कौशल्यातून साकारले इको-फ्रेंडली बाप्पा, मार्केट फेअरमधून विद्यार्थी घेणार उद्योजकतेचे धडेl

विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित कार्यशाळेतून साकारलेले गणपती व डेकोरेशन साहित्य शनिवारी होणाऱ्या मार्केट फेअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ! विद्यार्थी घेणार व्यवसायाचे धडेl

कौशल्यातून साकारले इको-फ्रेंडली बाप्पा, मार्केट फेअरमधून विद्यार्थी घेणार उद्योजकतेचे धडेl

प्रतिनिधी Editor Pradnyaruchi Kamble :
सुपे : 🌱 विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित कार्यशाळेतून साकारलेले गणपती व डेकोरेशन साहित्य शनिवारी होणाऱ्या मार्केट फेअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ! विद्यार्थी घेणार व्यवसायाचे धडे सुपे, प्रतिनिधी - दि.11 सप्टेंबर 2026 : विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये कौशल्याधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत इको-फ्रेंडली गणपती बनविण्याचे कौशल्य आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा वापर करून गणपती बाप्पाच्या विविध मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केल्या. गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक शिक्षिका निकिता लावंड यांनी विद्यार्थ्यांना दाखविले. मूर्तीला आकर्षक आकार देण्यासाठी पुठ्ठा किंवा लाकडी बेस, टूथपिक, लाकडी काड्या व चमचा यांचा वापर करण्यात आला. तसेच ॲक्रेलिक रंगांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार गणेशमूर्ती रंगवल्या. गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा ही तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आली.

या उपक्रमात वनस्पतींच्या बियांचा वापर करण्यात आल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलात्मकतेला आणि हस्तकौशल्याला चालना मिळाली.

“कलेतून कौशल्य आणि कौशल्यातून पर्यावरण संवर्धन” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व आनंददायी ठरली असे मत शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी या पुढील काळात आम्ही स्वतःच्या घरचे गणपती स्वतःच्या हातांनी पर्यावरण पूरक पद्धतीने बनवू अशी प्रतिज्ञा घेतली आणि यातून आम्ही पर्यावरण संवर्धन करू अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले गणपती व डेकोरेशनचे साहित्य शनिवारी शाळेत होणाऱ्या मार्केट फेअर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यातूनच विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्याचे व उद्योजकतेचे धडे दिले जाणार आहेत . विद्यार्थ्यांनी बनविलेले गणपती व डेकोरेशन साहित्य पालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावे असे आवाहन शाळेने व शिक्षकांनी केलेले आहे .

🌐www.vpsupenews.in
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६ | आवृत्ती: सुपे
VP Supe — News Digest

📹 Embedded YouTube Video

🌱 विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित कार्यशाळेतून साकारलेले गणपती व डेकोरेशन साहित्य शनिवारी होणाऱ्या मार्केट फेअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ! विद्यार्थी घेणार व्यवसायाचे धडे सुपे, प्रतिनिधी - दि.11 सप्टेंबर 2026 : विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये कौशल्याधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत इको-फ्रेंडली गणपती बनविण्याचे कौशल्य आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा वापर करून गणपती बाप्पाच्या विविध मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केल्या. गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक शिक्षिका निकिता लावंड यांनी विद्यार्थ्यांना दाखविले. मूर्तीला आकर्षक आकार देण्यासाठी पुठ्ठा किंवा लाकडी बेस, टूथपिक, लाकडी काड्या व चमचा यांचा वापर करण्यात आला. तसेच ॲक्रेलिक रंगांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार गणेशमूर्ती रंगवल्या. गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा ही तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आली. या उपक्रमात वनस्पतींच्या बियांचा वापर करण्यात आल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलात्मकतेला आणि हस्तकौशल्याला चालना मिळाली. “कलेतून कौशल्य आणि कौशल्यातून पर्यावरण संवर्धन” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व आनंददायी ठरली असे मत शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी व्यक्त केले. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी या पुढील काळात आम्ही स्वतःच्या घरचे गणपती स्वतःच्या हातांनी पर्यावरण पूरक पद्धतीने बनवू अशी प्रतिज्ञा घेतली आणि यातून आम्ही पर्यावरण संवर्धन करू अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले गणपती व डेकोरेशनचे साहित्य शनिवारी शाळेत होणाऱ्या मार्केट फेअर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यातूनच विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्याचे व उद्योजकतेचे धडे दिले जाणार आहेत . विद्यार्थ्यांनी बनविलेले गणपती व डेकोरेशन साहित्य पालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावे असे आवाहन शाळेने व शिक्षकांनी केलेले आहे .

💬Get Instant News on WhatsApp

Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.

Join WhatsApp Group →
Share this story:

Related School Stories

EVENTS

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा!

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

SPORTS

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

SPORTS

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.